क्रीडा

अक्षर पटेलला कोरोना लागण

 दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका

3 April :- अवघ्या काही दिवसांनीच म्हणजेच 9 एप्रिलपासून इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. पण, क्रिकेटचा महाकुंभ सुरु होण्यापूर्वीच यामध्ये सहभागी झालेल्या दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, संघातील ऑलराऊंडर म्हणून ओखळ असणारा खेळाडू अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं. दिल्ली कॅपिटल्स संघाशी संलग्न सुत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अक्षर पटेलला दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली असून, आता तो विलगीकरणात आहे. तसंच सर्व नियमांचं पालनही करत आहे. आयपीएल 2021 मध्ये दिल्लीच्या संघाचा पहिला सामना, 10 एप्रिलला होणार आहे. चेन्नईच्या संघाविरोधात हा सामना खेळला जाणार असल्याचं कळत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे हा सामना पार पडेल. पण, या सामन्याला अक्षर पटेल मात्र अनुपस्थित असणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.