राजकारण

संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांना कोरोनाची बाधा

उपचारासाठी रुग्णालयात दाखल

3 April :- शिवसेना खासदार संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा राउत यांना गेल्या 2 दिवसांपासून ताप आणि सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसून येत होती. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. वर्षा यांना फोर्टीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोबतच, संजय राउत यांनीही कोरोनाची चाचणी केल्याचे समजते.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

राउत यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. संजय राउत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पवार कुटुंबियांसाठी चिंता वाढली आहे. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राउत यांनी ब्रीच कँडी रुग्णालय गाठले होते. त्यानंतर आता राउत यांच्या पत्नी वर्षा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. संजय राउत यांचा कोरोनाचा अहवाल अद्याप समोर आला नाही. तरीही राउत यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास शरद पवारांना सुद्धा कोरोना विषाणूचा धोका असू शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर आणखी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेला हा कर्मचारी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहेत. रश्मी ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर आदित्य ठाकरे यांची चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांची सुटका केली जाईल.