श्वेताने मला दांडक्याने मारले, पती कोहलीने केला मारहाणीचा आरोप
थापडेबद्दल मी माफी मागितली आहे- अभिनव कोहली
3 April :- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अलीकडेच एका मुलाखतीत पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. अभिनवने आपल्यावर हात उगारला असा आरोप श्वेताने केला. श्वेताच्या या आरोपांना आता अभिनवनेही उत्तर दिले आहे. श्वेताने आपल्याला मारहाण केली होती, असा आरोप अभिनवने केला आहे. स्पॉटबॉयशी बोलताना अभिनव म्हणाला, “मी श्वेताला कधीही मारहाण केलेली नाही. केवळ एकदाच तिला चापट मारली होती. ज्याचा उल्लेख पलकने तिच्या पत्रात केला होता. ती एक घटना वगळता मी कधीही श्वेताला मारहाण केली नाही. त्या चापटीबाबत मी माफी मागितली आहे. पण श्वेता जाणूनबुजून सर्व गोंधळ निर्माण करत आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
मी तिच्यावर अन्याय, अत्याचार केला हे सिद्ध करण्यासाठी ती हे सर्व करत आहे. श्वेताच्या आरोपांत तथ्य नाही. मी महिलांवर कधीही हात उचलत नाही,” असे अभिनव म्हणाला. अभिनव पुढे म्हणाला, “नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली होती की मलाही राग येतो पण मी कुणालाही मारहाण केली नाही. पण तिने मला दांडक्याने मारहाण केली आणि जेव्हा तिने माझ्यावर हात उगारला तेव्हा हे कोणालाही कळले नाही. कारण मी मीडियात याविषयी काहीही बोललो नाही.’ अभिनवने श्वेतावर आरोप लावला की, श्वेताने त्याला मारहाण केली आणि जगासमोर त्याला बदनाम करण्यासाठी मुलगी पलकची मदत घेतली. अभिनवने सांगितल्यानुसार, तो हा लढा आपल्या मुलासाठी देतोय. त्याने मुलाखतीत सांगितले, ‘काही गोष्टींवर मी काय बोलू याचा विचार मी करत आहे.
मी माझ्या मुलासाठी लढत आहे, मी स्वत:साठी लढत नाही. श्वेता माझ्याशी अमानुषपणे वागली. खरं सांगायचे तर, लोकांशी बोलताना अजूनही माझ्या डोळ्यात अश्रू येतात, कारण श्वेताने माझा अमानुषपणे छळ केला. पण मी स्वत:साठी लढत नाही. ‘तू जे करत आहेस ते चुकीचे आहे. तू माझ्यासोबत जे काही केले ते तू विसरलीस,’ असे मला श्वेताला सांगायचे आहे. तिने दोन दिवसांसाठी मला तुरूंगात चुकीच्या गोष्टीसाठी ठेवले. त्यानंतर श्वेताची मुलगी पलक दुसऱ्या दिवशी पोस्ट करून सांगते की त्याने माझ्यावर लैंगिक गैरवर्तन केलेले नाही,’ असे अभिनव म्हणाला.
अभिनव पुढे म्हणाला, ‘तिने नंतर ती पोस्ट काढून टाकली. जेव्हा पलकने लिहिलेले ती पोस्ट मी रिपोस्ट केली तेव्हा तिने पुन्हा माझ्यावर गुन्हा दाखल केला. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तिने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. तो दिवस भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हे माहित असून ती रात्र मी कोठडीत घालवावी अशी तिची इच्छा होती. श्वेताने माझ्यासाठी जे केले ते अमानुष आहे. जेव्हा मी आमच्या मुलाची काळजी घेण्यात व्यस्त होतो, तेव्हा ती मीडियासमोर माझी बदनामी करत होती. मीडियासमोर तिने मला कॅन्सर म्हटले.’