सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये
प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती
3 April :- राज्यातील कोरोनाची स्थिती अतिवाईटाकडे जात आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं. मात्र राज्यात लॉकडाऊन लावणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र लॉकडाऊनला अनेकांनी कडाडून विरोध केला आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन न लावण्याची सरकारला विनंती केली आहे, लॉकडाऊन उपाय नाही. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये.