महाराष्ट्र

राज्यात लागणार लॉकडाऊन?; मंत्रालयातील सूत्रांची माहिती

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

3 April :- राज्यात कोरोना विषाणूचे सुरु झालेले महाकाय थैमान आटोक्यात येणाचे कुठलेच चित्र दिसत नसल्याने जनतेमध्ये लॉकडाऊनचे भय पसरले आहे. लॉकडाऊन लागणार का? लॉकडाऊन कधी लागणार? लॉकडाऊन किती दिवसांचा असणार? अशी अनेक प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत. लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील.

 वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यानच दिला होता. परंतु, कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं.

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय अटळ आहे. पण तो लागू कसा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, मीनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध या पर्यांयावर चर्चा होत आहे. नागरिकांचं अर्थचक्र न थांबता काही उपाय योजना करता येतील का ? कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने निर्बंध लावण्यात यावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.