सिनेमा,मनोरंजन

कादर खान यांच्या थोरल्या मुलाचे निधन

कॅनडामध्ये घेतला अखेरचा श्वास

1 April :- दिवंगत अभिनेते, कॉमेडियन आणि संवाद लेखक कादर खान यांचा थोरला मुलगा अब्दुल कुद्दूस यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, गुरुवारी त्यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. कुद्दूस यांनी स्वत:ला कायम प्रसिद्धीपासून दूर ठेवले आणि कॅनडामधील विमानतळावर ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होते. एका मुलाखतीत कादर खान यांनी सांगितले होते की, कुद्दूसमुळेच त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणे बंद केले होते. ते म्हणाले होते, “माझा मोठा मुलगा कुद्दूस मित्रांसोबत खेळून फाटलेल्या कपड्यांमध्ये घरी आला.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

चित्रपटाच्या शेवटी खलनायक म्हणून मला नेहमीच मारहाण केली जात असे. मुलाच्या मित्रांनी त्याला म्हटले की, तुझे वडी लोकांना मारहाण करतात म्हणून शेवटी त्यांना मारहाण केली जाते. अशा प्रतिक्रिया ऐकून कुद्दूस चिडायचा आणि त्याचे त्याच्या मित्रांशी भांडण होत असते. एके दिवशी तो घरी आला तेव्हा त्याला खूप दुखापत झाली होती.

मला स्वतःचा खूप राग आला आणि मी आता व्हिलनची भूमिका स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला. त्यावेळी ‘हिम्मतवाला’ हा विनोदी चित्रपट तयार होत होता आणि तेथूनच मी कॉमिक रोल करण्यास सुरुवात केली,’ असे कादर खान यांनी सांगितले होते. सरफराजने ‘तेरे नाम’, ‘मैने दिल तुझको दिया’ आणि ‘वाँटेड’ या चित्रपटांसाठी निर्माता म्हणून काम केले आहे, तर शाहनवाजने ‘मिलेंगे मिलेंगे’ आणि ‘हमको तुमसे प्यार है’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले आहे.