महाराष्ट्र

पालकांनो काळजी घ्या, लहान मुलांना होऊ लागली कोरोनाची बाधा

साडेसहा लाख मुलांना झाली कोरोनाची बाधा

1 April :- महाराष्ट्रात कोरोनाचे महाभयंकर थैमान सुरु झाले आहे. दररोज कोरोना बाधितांचा एकदा वाढू लागल्याने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता लहान मुलांना सुद्धा कोरोनाची बाधा जास्त प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 10 ते 20 वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे. मार्चमध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील तब्बल 55 हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोना बाधित झाल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

तात्याराव लहाने म्हणाले की, राज्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे , नवीन ट्रेंड मुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन ट्रेंडमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या स्ट्रेनच्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते, आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. आधी 50 वयाच्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत. 5 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना संक्रमण होत आहे. पण यात 10 वयावरील मुलांना कोरोनाची अधिक लागण होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुलांना कोरोना होत असला तरी घाबरण्याचं कारण नाही. पालकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं लहानेंनी सांगितलं. ते म्हणाले की, राज्यात कोरोना वाढत आहे. अजून लॉकडाऊनचा विचार झाला नाही, पण निर्बंध लावले जातील. पण कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढली. नागरिकांनी ऐकलं नाही तर मात्र लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो. कोरोनाची ही दुसरी लाट आली आहे, यात वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे. मुंबईत रुग्ण संख्या अधिक वाढत आहे. मुंबईत ऑफिस कर्मचारी 50 टक्के उपस्थितीचा विचार आहे. गर्दी कशी टाळता येईल यावर विचार केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.