लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा उद्रेक
आज २५८ रुग्ण कोरोनामुक्त
1 April :- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात येत नाहीए. दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख बीड जिल्ह्यात उंचावत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून 393 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून झाले आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
2 हजार 956 जणांच्या चाचण्या घेतल्या असता त्यामध्ये बीड 127, आष्टी 45, पाटोदा 26, गेवराई 11, माजलगाव 34, शिरूर 5, धारूर 4, वडवणी 9, परळी 34, अंबाजोगाई 65, केज तालुक्यात 33 कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना वाढत चालल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह मास्क लावून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.दिवसेंदिवस वाढत असलेला बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.