प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट! म्हणाले, दिपाली चव्हाणाच्या आत्महत्येच्या मुळाशी
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
31 March :- मेळघाटमधील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी मेळघाट आणि धारणी क्षेत्रातील वाघ आणि सागवान तस्कर असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोला येथे शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. धारणी आणि मेळघाटमधील वाघ कमी होणे, वाघाची तस्करी, सागवानाची अवैध विक्री यातूनच दिपाली यांना या साखळीनं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं आंबेडकर म्हणालेत.
यासंदर्भात आंबेडकरांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आठवडाभरात सरकारनं ठोस कारवाई न केल्यास पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही यावेळी आंबेडकरांनी सरकारला दिला आहे. प्रकाश आंबेडकर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगानं आंबेडकर यांनी मेळघाटात काम करणाऱ्या ‘एनजीओ’ (गैरसरकारी सामाजिक संस्था) यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच गेल्या काळात कायद्याने बंदी असलेल्या आदिवासींच्या जमीन विक्रीच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात नुकतंच निलंबन झालेल्या अमरावतीचे अप्पर प्रधान वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्ह्याला प्रोत्साहीत केल्याचा आरोप ठेवत नव्यानं गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली आहे.