लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
31 March :- राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत चर्चा सुरू असते. कडक निर्बंधांबाबत शासन पाऊल उचलेल. लोकांनी गर्दी टाळावी हा दृष्टीकोन आहे.
गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध आणत आहोत, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. औरंगाबामध्ये काल झालेल्या गर्दीबाबत बोलताना टोपे म्हणाले की, अशी गर्दी करणे हे परवडणारे नाही. अशी गर्दी होत कामा नये. खासदार इम्तियाज जलील भान ठेवतील अपेक्षा आहे.
टोपे म्हणाले की, शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे एडमिट केलं आहे. पोट दुखण्याचे कारण पित्तनलिकेच्या मुखाशी खडा निर्माण झाला होता, त्यामुळे त्रास होत होता. एंडोस्कोपीने तो खडा काढला आहे. अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. आता ते स्टेबल होत आहेत. चार ते पाच दिवसाने डिस्चार्ज करता येईल.