बीड

कोरोनाचे मीटर थांबेना; आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

31 March :- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन केले असतानाही जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. आरोग्य विभागाने काल २२३१ संशयितांचे अहवाल घेतले होते. याचा रिपोर्ट आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ३२५ जण बाधित तर १ हजार ९०६ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५०, आष्टी ३४, बीड ९८, धारूर ४, गेवराई २१, केज २१, माजलगाव २०, परळी ४१, पाटोदा २४, शिरूर ७ आणि वडवणी तालुक्यात ५ रुग्ण आढळून आले आहेत.दिवसेंदिवस वाढत असलेला बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.