लॉकडाऊन रद्द!
व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे औरंगाबाद शहरात लॉकडाऊन रद्द!
30 March :- कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. पण, स्थानिक व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधामुळे प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे. औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाउन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आधी कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर आता 10 दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. 30 मार्च ते 8 एप्रिल अशी तारखी सुद्धा ठरली होती. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आज 30 मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन सुनिल चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय रद्द केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांची आकडेवारी पाहता आज रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू होणार होती, लॉकडाऊन होणार होता मात्र जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांनी तातडीची बैठक घेत आजपासून होणारा जो लॉकडाऊन आहे तो रद्द झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. मात्र, जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊनचे नियम लागू राहतील, अशी माहितीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.