महाराष्ट्र

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का?

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा

30 March :- राज्यात कोरोना विषाणूचे वाढते थैमान दिवसेंदिवस चिंतेचा विषय बानू लागले आहे तर सर्वसामान्यांना लॉकडाऊनची धडकी भरू लागली आहे. राज्यात कोरोनाचा आलेख दरदिवशी वाढू लागल्याने लॉकडाऊन होणार का हा प्रश्न सर्वांना भेडसावू लागला आहे. कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली. राज्याच्या आरोग्यविभागानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळं 139 जण दगावले. कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही राज्यात मोठा असला तरीही या दुसऱ्या लाटेमध्ये नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण मात्र अडचणीत आणणारं ठरत आहे.

आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार राज्यात मंगळवारी तब्बल 23,820 रुग्णांना रुग्णालयाचून रजा देण्यात आली. सध्या राज्याचा एकूण रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे.