बीड

बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही वाढतोय कोरोनाचा कहर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

30 March :- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन केले असतानाही जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. आरोग्य विभागाने २०३६ संशयितांचे स्वॅब काल घेतले होते. याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ३१८ जण बाधित आढळून आले आहेत. लॉकडाऊन झाल्यानंतर रूग्णांची संख्या कमी होईल असे आरोग्य विभागाला वाटत होते. मात्र दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्या वाढू लागली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

काल २०३६ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी ३१८ जण बाधित आढळून आले असून १७१८ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक आकडा आजही बीड तालुक्याचाच असून तो ८८ आहे. त्यापाठोपाठ अंबाजोगाई ५९, आष्टी ४२, धारूर ७, गेवराई ९, केज २५, माजलगाव ३१, परळी ३८, पाटोदा १८, वडवणी तालुक्यात १ रूग्ण आढळून आला आहे.दिवसेंदिवस वाढत असलेला बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.