महाराष्ट्र

मोठी बातमी! शरद पवार रुग्णालयात दाखल

पोटदुखीच्या त्रासामुळे करण्यात आले रुग्णालयात दाखल करण्यात

29 March :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णलयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रूप

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 31 मार्च रोजी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समजते. तसंच एन्डोस्कोपी करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, शरद पवार यांची तब्येत रविवारीच थोडी बिघडली होती.

सध्या त्यांना ८-१० दिवस आरामाची गरज आहे. एक छोटी शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा केरळ आणि एप्रिलमधील बंगालचा दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.