बीड

बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे नवे आदेश

लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिली सूट

29 March :- वाढत्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाला थोपवण्यासाठी बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले होते, त्यानंतर पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकड़े शिथिलते सन्दर्भत मागणी केली होती.

झुंजारनेता वर क्लीक करून ज्वाइन करा वॉट्सअप्प गृओ

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील उद्या पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली असून सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत व्यापार करण्यास परवानगी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.