बीड कोरोना ब्रेकिंग: आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह!
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
29 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आजही बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या साडे तीनशेच्या पार गेली आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
आज सोमवारी दिनांक 29 मार्च रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात 386 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी 1823 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 75, आष्टी 41, बीड 172, धारूर 9, गेवराई 13, माजलगाव 14, परळी 29, पाटोदा 11, शिरूर 6, वडवणी 7 रुग्ण सापडले. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.