विनाकारण घराबाहेर पडाल तर होईल धुलाई
सडकफिऱ्यांना पोलीस प्रशासनाने दिला काठीचा प्रसाद
28 March :- बीड जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठीच जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात१० दिवसांचे लॉकडाऊन केलेले आहे. मात्र बीड शहरात काही तरुण कारण नसताना घराबाहेर पडत असून दुचाकीवर सर्वत्र फिरत आहेत. बीड शहरात विनाकारण फिरण्यार्या हौशी तरुणांना, पोलिस प्रशासनाकडुन चांगलाच चोप देण्यात आलाय.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
काही कारण नसतांना विनाकारण बाहेर पडणं या तरुणांना चांगलंच महागात पडलंय. शहरातील खासबाग, बशीरगंज ,शिवाजी महाराज चौक यासह अनेक भागात हौशी तरुण मंडळी विनाकारण दुचाकीवर बाहेर फिरत होती.याच विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा काठीचा प्रसाद मिळालाय.
यामुळे काही वेळातच शहरातील विनाकारण फिरणारी मंडळी कमी झाली होती.दरम्यान संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिस अधीक्षक आर.राजास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली , बीड शहरासह जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.