महाराष्ट्र

सूर्यनारायणाचा वाढणार प्रकोप

मराठवाड्यात उकाडा वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा

28 March :- मार्च महिन्याच्या मध्यापासूनच राज्यात सर्वत्र उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आणि महिना अखेरीपर्यंत पारा सातत्यानं वरच जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानात होणारी वाढ पाहता हवामान खात्याकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

शनिवारी मुंबईत झालेल्या तापमानवाढीनंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे येते दोन दिवस उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या भागांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मुंबईतही सूर्यनारायणाचा प्रकोप दिसून येणार आहे.