बीड

कोरोनाचा कहर काही प्रमाणात आटोक्यात

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

28 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. जिल्ह्यातील तीन हजाराच्या आसपास स्वॅब टेस्ट केल्यानंतर रविवारी कोरोना बाधितांचा आकडा 284 वर गेला, शनिवारच्या तुलनेत तब्बल शंभर ने आकडा कमी झाला.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

दररोज शंभर ते सव्वाशे च्या घरात असलेला बीड तालुक्याचा आकडा रविवारी मात्र 59 वर आटोपला तर अंबाजोगाईचा आकडा 73 पर्यंत खाली आला आहे .रविवारी आलेल्या अहवालात वडवणी 4, शिरूर 6, पाटोदा 10, परळी 37, माजलगाव 32, केज 13, गेवराई 5, धारूर 8, बीड 59, आष्टी 30 आणि अंबाजोगाई मध्ये 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .दिवसेंदिवस वाढत असलेला बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.