सिनेमा,मनोरंजन

बाबू भैय्या कोरोनाच्या विळख्यात

परेश रावल यांनी स्वतः दिली माहिती

27 March :- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता नुकतेच बॉलिवूडचे बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. याविषयीची माहिती स्वतः परेश रावल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. यासोबतच त्यांनी आवाहन केले आहे की, गेल्या 10 दिवसांमध्ये जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

परेश रावल यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, ‘दुर्दैवाने माझी कोविड-19 टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये जे कुणी माझ्या संपर्कात आहे आहेत, त्या सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी.’ लस घेतल्यानंतरही परेश रावल कोरोना संक्रमित झाले आहेत. त्यांनी 9 मार्चला कोविड-19 लसीचा पहिला डोज घेतला होता.

65 वर्षांचे परेश रावल यांनी व्हॅक्सीन घेतल्यानंतर सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘V फॉर व्हॅक्सीन, सर्व डॉक्टर्स, नर्स, फ्रंट लाइन हेल्थ केअर वर्कर्स, वैज्ञानिक आमि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप खूप धन्यवाद’ लस घेतल्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आढळणारे परेश दुसरे बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. त्यांच्यापहिले याच आठवड्यात फिल्ममेकर रमेश तौरानी पॉजिटिव्ह आढळले होते. त्यांनीही कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला होता.