महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

27 March :- कोरोनाचा वाढता कहर, प्रशासनाने अहवान करूनही नागरिकांकडून होत असलेली कोरोना विषयक नियमावलीची पायमल्ली लक्षात घेत अखेर औरंगाबादमध्येही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद शहरात येत्या 30 मार्च पासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला असून, लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी 12 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी बंद केल्या जातील. दरम्यान, या काळात अत्यावश्यक सेवा आणि उद्योग सुरू राहतील. याशिवाय, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून औरंगाबाद शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली. मार्च महिन्यात तर करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन हादरुन गेले आहे. दहा-बारा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात मिळून एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत सापडले आहे.