महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आज पुन्हा झाली विक्रमी नोंद

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

27 March :- राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा सलग दुसऱ्या दिवशी विस्फोट झाला आहे. राज्यात आज तब्बल 36 हजार 902 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ पाहता राज्यावर लॉकडाऊनची छाया गडद होताना दिसत आहे. तसे संकेत वारंवार सरकारकडून देण्यात येत आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभरात रविवार 28 मार्च 2021 पासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज नवीन 17 हजार 019 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2300056 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 28 हजार 2451 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2%झाले आहे.