बीड

बीड जिल्ह्यात होणार 10 दिवसाचे लॉकडाऊन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिला लॉकडाऊनला दुजोरा

23 March :- बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक कोरोना विषयक नियमावलीची पायमल्ली करत असल्याने हा आकडा वाढतो आहे. बीड जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांचे दुकान सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने अखेर बुधवार पासून बीड जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून ज्वाईन करा वॉट्सअँप ग्रुप, आणि मिळावा जभरातील ताज्या घडामोडींचं अपडेट्स

याबाबत सध्यातरी अधिकृत आदेश आलेले नाहीत. हा लॉक डाऊन किती दिवसासाठी असेल याची देखील पूर्ण माहिती मिळू शकली नाही. मात्र 25 मार्चला रात्री १२ वाजल्यापासून ते ४ एप्रिल असा 10 दिवसांसाठी बीड जिल्हा बंद राहणार आहे या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे. यामुळे 25 मार्चला सायंकाळी ७ वाजता बंद केलेली दुकाने ५ अप्रीलाच उघडणार आहेत.