महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत बस सेवा पुर्णतः बंद

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रशासन गंभीर

22 परभणी जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आजपासून आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत बस सेवा 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे. रोज साधारणतः जिल्ह्यातून 800 ते 900 बस फेऱ्या होत असतात त्या बंद झाल्या असल्याने एसटी महामंडळाला रोज 30 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

‘दै.झुंजारनेता वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँप लाईव्ह अपडेटस

याशिवाय हॉटेल्स, रेस्टारंट, चहा ठेले, पानपट्टी धारक यांनाही आपली प्रतिष्ठाणं बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. एकूणच वाढत्या संसर्गाने जिल्ह्यातील निर्बंध हे अधिकपणे कडक करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने कडक पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर 18 मार्चला एसटी बसला तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला होता.