भारत

सरकारच्या नव्या गाइडलाईन्स, वाचा सविस्तर

4 ऐवजी 8 आठवड्यानंतर मिळणार लसीचा दुसरा डोस

22 March :- सरकारने अँस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील वेळेला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार, कोवीशील्डच्या दोन डोसमध्ये आता कमीत-कमी 6 ते 8 आठवड्यांचे अंतर ठेवले जाईल. सध्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर आहे. दरम्यान, हा निर्णय कोव्हॅक्सिनवर लागू होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

‘दै.झुंजारनेता वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँप लाईव्ह अपडेटस

केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) आणि व्हॅक्सीनेशन एक्सपर्ट ग्रुपच्या ताजा रिसर्चनंतर हा निर्णय घेतला जात आहे. या निर्णयाचे अंमलबजावनी राज्य सरकारने करण्याचेही केंद्राने सांगितेल आहे. दावा केला जात आहे की, व्हॅक्सीनचा दुसरा डोस 6-8 आठवड्यानंतर दिल्यानंतर व्हॅक्सीनचा परिणाम जास्त मिळत आहे.