विवाहित प्रेयसीच्या घरात घेतला शिवसेना नेत्याने गळफास
विवाहित महिलेशी होते प्रेम संबंध
19 March :- औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद परिसरातील प्रेसीच्या घरात जाऊन चक्क सुनील प्रकाश खजिनदार या शिवसैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिवसेनेचे पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांचे दौलताबाद परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी खजिनदार यांचे लग्न जमले .
‘दै.झुंजारनेता वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँप लाईव्ह अपडेटस
हि माहिती त्यांच्या प्रियसीला समजताच प्रियसीने त्यांना लाग्नासंदार्भात विचारणा केली, त्यावरून दोघात वाद झाला आणि त्यानंतर खजिनदार यांनी तिच्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान , गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शुक्रवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
त्यानंतर नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात दाखल करत महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे देखील पोलीस ठाण्यात उपस्थित होते . दरम्यान या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे . या आत्महत्ये मुळे परिसरात दुःख वयकत केले जात आहे.