महाराष्ट्र

वाचा, राज्यात आज किती कोरोना बाधित रुग्णांची झाली नोंद

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

19 March :- राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांचे नोंद झाली. आज राज्यात 25,681 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज 70 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.20% एवढा आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतचे उच्चांकी आकडे येत असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती असावी असे आदेश शासनाने काढले आहेत.

‘दै.झुंजारनेता वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँप लाईव्ह अपडेटस

आज 14,400 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 21,89,965 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.42% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,80,83,977 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 24,22,021 (13.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,77,560 अॅक्टीव रुग्ण आहेत.

मुंबईत पुन्हा कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पहायला मिळाला आहे. आज मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या 3000 पार गेली आहे. आज 3062 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात आज तब्बल 5065 कोरोना रुग्णांची नोंद तर 24 रुग्णांचा मृत्यू. 9510 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे.