बीड

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज 294 पॉझिटिव्ह रूग्ण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा

19 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आज १९ रोजी प्राप्त झालेल्या कोरोनाच्या अहवालात 294 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 897 जणांचे निगेटीव्ह रिपोर्ट्स आले आहेत.

‘दै.झुंजारनेता वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँप लाईव्ह अपडेटस

अंबाजोगाई 58, आष्टी 33, बीड 117, धारूर 7, गेवराई 14, केज 10, माजलगाव 26, परळी 22, पाटोदा 1, शिरूर 4 आणि वडवणीमध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत. बीड शहरासह तालुक्यात सर्वात जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येवू लागले आहेत. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन नागरिकांनी तोंडावर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.