महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्य सरकारकडून कोरोनासंबंधी नव्या गाईडलाईन्स जारी

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली

19 :- March :- राज्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारकडून संपूर्ण राज्यात कडक निबंध लागू करण्यात येत आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार राज्यातील सर्व खासगी ऑफीसमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची संख्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिकडे, मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या बस थांबवल्याची माहिती समोर आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवरलाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनामुळे मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी शेकडो-हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.

यासोबतच, राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवावी लागेल. यात, आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांना वगळण्यात आले आहे. त्याशिवाय नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.