राजकारण

फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?

उर्मिला मातोंडकर यांचा सवाल

18 March :- उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी 17 मार्च रोजी देहरादून येथील कार्यक्रमात महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सध्या त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार तरुण सांभाळतील, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय असा सवाल उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन देशभरातून राग व्यक्त व्यक्त केला जात आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शिवसेनेच्या अनेक महिला नेत्यांनी ट्वीट करीत त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फाटक्या जीन्सच्या वापरावरून तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले की, ‘मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते’.


यावर रावत यांनी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. ते पुढे असं म्हणाले की, ‘माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल लागेल.’ त्यांनी पुढे असं देखील म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहावं लागेल. रावत यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटत आहेत.