बीड

बीड जिल्ह्यात आज २६६ जणांना कोरोनाची लागण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

17 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्याच्या चाचण्या वाढल्याने बाधितांच्या आकड्यात ही भरू पडू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. आरोग्य विभागाने कोरोना रूग्णांचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. त्यात मोठ्या संख्येने व्यापारी बाधीत आढळून येत आहेत. या बरोबर नागरिकांचे स्वॅबही घेणे सुरू आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बुधवारी १७ मार्च रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात २०९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २६६ पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड शहरातील आहेत. आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ६०, आष्टी९, बीड १००, धारूर ४, गेवराई १८, केज ८, माजलगाव ३५, परळी १५, पाटोदा ९, शिरूर ४ तर वडवणीत 4 रुग्णाचा समावेश आहे..कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन नागरिकांनी तोंडावर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.