बीड

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचा नवा आदेश; बीडकरांना मोठा दिलासा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा

16 March :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, खानावळी, चहाचे गाडे यावर लावलेली बंदी जिल्हा प्रशासनाकडून शिथिल करण्यात आली आहे. आता हे सर्व व्यवसाय 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हे आदेश दिले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्यानंतर हॉटेल, बार, खानावळी, चहाचे गाडे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. या बंदी आदेशाविरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत होते. व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना निवेदने दिली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बंदी आदेशात सुधारणा केल्या असून आता निम्म्या क्षमतेने हॉटेल, खानावळी, बार, चहाचे गाडे सुरू ठेवता येणार आहेत. मात्र या ठिकाणी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जावू नये असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.