News

तारांच्या घर्षणाने पशुधन जळून खाक

तारांच्या घर्षणाने पशुधन जळून खाक शेतकऱ्याचे मोठं नुकसान


सिरसाळा प्रतिनिधीविजेच्या खांबावरील तारा एकास एक चिटकून पडलेल्या थिनग्या मुळे कडबा भुसा व काही पत्र जळून खाक झाले आहेत आगीची ही घटना सिरसाळा पोहणेर रस्त्यावरील असणाऱ्या घन्हाळ तांड्यातील शिंदे वस्ती या ठिकाणी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.सुदैवानं यात कोणासही इजा झाली नसली तरी शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं आहे.

सिरसाळा पोहणेर मार्गावर घन्हाळतांडा या ठिकाणी शिंदे वस्ती आहे मंगळवारी दुपारच्या वेळी विजेच्या खांबावरील ढिल्या असणाऱ्या तारांचे अचानक घर्षण होऊन थिनग्या खाली पडल्याने वस्ती वरील हरिभाऊ लिंबाजी शिंदे यांचा 2 हजार बाजरीचा कडबा, तुरीचे भुस्कट, व त्यांच्या झाकलेले पत्र जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. आग लागल्याचे कळताच शेजारी असणारे वसंत राठोड, रामकीशन शिंदे, रोहिदास राठोड, बळीराम राठोड, दत्ता हराळ, विष्णू रुपनर यांच्या सह अनेकांनी घरातील पाणी टाकून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परळी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तासा भरात आग ही आटोक्यात आणली. घटनेस्थळी मंडळ अधिकारी एन आय शेख व सिरसाळ्याचे स पो नि श्रीकांत डोंगरे यांनी जाऊन पाहणी केली.पंचनामा केल्या नंतरच किती नुकसान झाले आहे ते सांगू पंचनामा करण्याचे आदेश ही दिले असल्याचे मंडळअधिकारी शेख यांनी सांगितले.