जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरु; आज 283 जणांना झाली बाधा
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा
16 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्याच्या चाचण्या वाढल्याने बाधितांच्या आकड्यात ही भरू पडू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. आरोग्य विभागाने कोरोना रूग्णांचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापार्यांच्या अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. त्यात मोठ्या संख्येने व्यापारी बाधीत आढळून येत आहेत. या बरोबर नागरिकांचे स्वॅबही घेणे सुरू आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
काल तब्बल २ हजार ६२५ संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये आज १६ मार्च रोजी २८३ जण बाधीत तर २ हजार ३४२ जण निगेटीव्ह आढळून आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५८, आष्टी १५, बीड ९४, धारूर ५, गेवराई १५, केज १४, माजलगाव ४१, परळी २४, पाटोदा १०, शिरूर ३ तर वडवणी तालुक्यात ४ रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन नागरिकांनी तोंडावर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.