वडगाव गुंधा गावातील घर जळून खाक; मोठ्या प्रमाणात झाले आर्थिक नुकसान
महावितरण विभागाच्या गलथान कारभार
16 March :- थकीत वीज बिलामुळे महावितरण विभागाने अनेक ग्रामीण भागातील वीज प्रवाह खंडित केला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये अंधार पसरला आहे. बीड तालुक्यातील वडगाव गुंधा या गावातील वीज प्रवाह खंडित केल्या गेल्यामुळे काल मध्य रात्रीच्या सुमारास सुधीर माने यांच्या घरात उजेडासाठी पेटवल्या गेलेल्या मेणबत्तीमुळे मोठी आग लागली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीमध्ये संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे. तर घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जळाल्या आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
या आगीमध्ये सुधीर माने यांच्या पत्नी तसेच दोन लहान मुलं भाजल्या गेली. या आगीमध्ये सुधीर माने यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच झाला, असे मत वडगाव गुंधा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. झुंजार नेता लाइव्हसाठी राहुल जामकर, पिंपळनेर.