महाराष्ट्र

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून राज्यात नवी नियमावली

वाचा सविस्तर, काय राहणार सुरु आणि बंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही 15 हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडलेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केलीय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आलीय. नव्या नियमावलीनुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट यांना 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारनं मुभा दिलीय. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहे. मास्क नसल्यास ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तापमान यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही.


सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट हे 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील.
मास्क घातलेले नसल्यास सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट प्रवेश मिळणार नाही.
तापमान यंत्रणानं तपासणी केल्यानंतर कोणाला ताप असलेलं आढळल्यास त्यांना प्रवेश देण्यात येणार नाही.


प्रत्येक ठिकाणी हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे.
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम
जर एखाद्यानं या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांकडून दंडही वसूल केला जाणार
.


तसेच लग्न समारंभात 50 लोकांनाही परवानगी असेल. तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येणार
अंत्यविधीसाठी 20 जणांनाच परवानगी असेल. तसेच तिथल्या स्थानिक प्रशासनानं याची खातरजमा करावी, जास्त लोक आढळल्यास कारवाई होणार
होम क्वारंटाईन व्यक्तींवर शासनाचा कोरोना स्टॅम्प असणं आवश्यक
.