महाराष्ट्र

वाचा, राज्यात आज किती कोरोना बाधितांची झाली नोंद

आज 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त

दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज 16 हजार 620 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 126231 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% वर पोहोचलं आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. नागपुरात आज दिवसभरात 2 हजार 252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या नागपूर जिल्हा आणि शहरात एकूण 16 हजार 630 रुग्ण कोरोना बाधित असून कोरोनावर उपचार घेत आहेत.

नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे.