बीड

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक; आज 260 जण पॉझिटिव्ह!

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

14 :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले कि रुग्णसंख्या कमी येत आहे आणि कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले की रुग्णसंख्येत घट पडत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

रवीवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील तब्ब्ल 2641 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 260 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले तर 2381जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई येथे 52 , बीड- 123, आष्टी-15 , धारूर- 2, गेवराई- 9, केज- 15, माजलगाव- 19, परळी- 13, पाटोदा- 5,वडवणी- 2 तर शिरूर तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन नागरिकांनी तोंडावर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे करावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.