महाराष्ट्र

‘हे’ शहर बनले कोरोना हॉटस्पॉट; राज्यातील आजची रुग्णवाढ चिंताजनक

काळजी घ्या, कोरोना संसर्ग!

13 March :- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. अशातच राज्यात आज दिवसभरात 15 हजार 602 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आज दिवसभरात 7 हजार 467 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 21 लाख 25 हजार 211 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात एकूण 11 लाख 8 हजार 525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेच्यावर आहे तर नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल 2000 हजारांच्या पार गेली आहे. नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आलाय.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे.परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर, राज्यातही काही अंशी सार्वत्रिक लॉकडाऊन नाकारता येत नाही.