महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये ‘या’ दिवशी पूर्णत: लाॅकडाऊन

वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

13 March :- देशात सर्वत्र पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा फैलाव वेगाने सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात संचारबंदी तथा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहे तर काही जिल्ह्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात शुक्रवारी १५,८१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ते देशातील एकूण रुग्णांच्या ६१.४८% आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी ६१७ नवे रुग्ण, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

जानेवारीत ९५% वर गेलेला रिकव्हरी रेट आता ८८% पर्यंत घसरला आहे. शहरातील सर्व प्रमुख रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शनिवार व रविवारी १०० टक्के लाॅकडाऊन असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा, रुग्णालये, मेडिकल, किराणा दुकाने, एसटी बसेसची सेवा वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद राहतील.

दरम्यान, पुण्यात निर्बंध आणखी कडक केले आहेत. परभणीत रात्री १२ पासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल. अकोला जिल्ह्यात शनिवार-रविवारचे लॉकडाऊन रद्द करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत निर्बंध असतील. बुलडाण्यात पूर्वीचीच संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.