बीड

जिल्ह्यात संक्रमणाचा वाढला वेग; आज ‘इतक्या’ जणांना कोरोनाची बाधा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

13 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. याच सर्व बाबी लक्षात घेत आज बीड जिल्हाधीकारी रवींद्र जगताप यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहे. आज बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा दीडशे पार गेली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1691 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 181 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले तर 1510 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई येथे 33 , बीड- 82, आष्टी-18 , गेवराई- 12, केज- 12, माजलगाव- 5, परळी- 7, पाटोदा- 2,वडवणी- 5 तर शिरूर तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन नागरिकांनी तोंडावर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे करावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.