News

बीडमध्ये नवगण कॉलेज परिसरातील आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

बीड : बीडच्या काल प्रलंबित असलेल्या सात अहवालांचा निष्कर्ष आला असून यातील दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 5 निगेटीव्ह आले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता 41 झाली आहे. रविवारी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील पन्नास निगेटीव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र उरलेल्या सातपैकी दोनजण पॉझिटी आले असून ते बीड शहरातील नवगण कॉलेज परिसरातील असल्याचे समजते.