बीड

बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू; जिल्हाधिकाऱ्यांची नवे आदेश!

रूग्णवाढीमुळे घेतला निर्णय!

13 March :- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शाळा, मंदिरांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घालूनही कोरोनाचा आकडा दररोज झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यासह अन्य काही आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस


जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज दि.13 मार्च रोजी नविन आदेश जारी केले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, पानटपरी इ. ग्राहकांसाठी आजपासुन पुर्णत: बंद राहतील. केवळ पार्सल सुविधा सुरू राहतील. असे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल व इतर कार्यक्रम दि.18 मार्च 2021 पासुन पुढे अनिश्चीत काळासाठी बंद राहतील.

जिल्ह्यातील फळविक्रेते व भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करून फळ व भाजीपाला विक्री करावा. जिल्ह्यातील सर्व दुकाने/आस्थापना (सर्व अत्यावश्यक किराणा, दुध विक्रेते आणि औषधालय/मेडिकल वगळून) दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज दिले आहेत.