राज्यात आजही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
12 March :- कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा सर्वत्र कहर वाढला आहे. कोरोनाचा वेगाने होत फैलाव हा चिंताजनक होत चालला आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
राज्यात आज 14,317 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून आज 7 हजार 193 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 57 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 06 हजार 400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण 1 लाख 6 हजार 70 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.94 टक्क्यांवर आलं आहे.