दगडावर डोक आपटून केला वृद्ध आईचा खून
केवळ 1 लाख रुपयांसाठी मुलीने आईचा केला खून
12 March :- असं म्हणतात की आईवर सर्वात जास्त जीव हा मुलीचा असतो. मात्र अकोल्यामध्ये घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने हे विधानच बदलून टाकले आहे. केवळ 1 लाख रुपयांसाठी मुलीने वृद्ध आईचे दगडावर डोके आपटून जीवे मारले. तीन मुलीच असल्याने आईने तिघींच्याही नावाने शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी करून दिली होती. कविताला सात गुंठे जमीन अधिकची देण्यात आली होती. ते गुंठे कविताने विकल्यानंतर आईने तिला त्यातील एक लाख रुपये मागितले.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पैसे देण्याच्या वादातून कविता आणि आईमध्ये वाद झाले. त्यानंतर कविताने आईला दगडावर आपटून तिचा खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिरी नगरातील स्वप्न शिल्प अपार्टमेंटमध्ये घडली. सुरुवातीला आई पडली आणि तिच्या डोक्याला लागल्याने तिचा मृत्यू झाला असा बनाव कविताने केला होता. मात्र, तिला पोलिस खाक्या दाखवताच तिने आईच्या हत्येची कबुली दिली. सरुबाई काशीनाथ कांडेलकर वय ६१ यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. मात्र पोलिसांनी सरुबाई यांची मुलगी कविता दिनकर बायस्कर वय ४० हिला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली.
आईचे आणि माझे किरकोळ भांडण झाले. त्यात आई पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे ती पोलिसांना बनाव करत होती. मात्र घरातील रक्ताचा सडा पाहून पोलिसांना आधीच संशय आला होता. त्यानुसार पोलिसांच्या चौकशीत कविता पोपटासारखी बोलू लागली आणि पैशाच्या वादातून हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सरुबाईला मुलगा नसल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी तिन्ही मुलींच्या नावे शेती करून दिली होती. कविताच्या वाट्याला सात गुंठे शिल्लक देण्यात आले होते व त्यातील काही रक्कम आईला देण्याचे ठरले होते.
कविताने शिल्लक आलेले सात गुंठे विकले आणि दरम्यानच्या काळात मुक्ताईनगर येथे सरुबाई यांनी घर विकत घेतले होते. मात्र त्यांना एक लाख रुपये कमी पडत असल्याने त्यांनी कविताला एक लाख रुपये मागितले. देते देते असे म्हणून कविता आणि आई सरुबाईमध्ये कडाक्याचे भांडण झाले व त्यांच्यात झटापट झाली. याचवेळी कविताने आई सरुबाई यांचे डोके घरातील कपडे धुण्याच्या दगडावर जोरजोरात आपटले आणि त्यातच सरुबाई यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार डी.सी. खंडेराव करीत आहेत.