बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वेगाने सुरू; वाचा किती जणांना झाली कोरोनाची बाधा
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
12 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आज बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या दीडशे पार गेली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील १७१७ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी १६३ जण कोरना विषाणूची लागण झाले असल्याचे निष्पन्न झाले तर १५५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई२७ , बीड १००, आष्टी४ , गेवराई ९,केज १,माजलगाव ८, धारूर १, परळी ७ , पाटोदा २,वडवणी १ तर शिरूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.