बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम; आज आढळले इतके रुग्ण पॉझिटिव्ह!
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
10 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आज बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शंभरी पार गेली आहे. आज बुधवारी दिनांक 10 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 1063 अहवालात तब्बल 110 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.
यात बीडमधील सर्वाधिक 57 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 10, आष्टी-11, धारूर-1, गेवराई-5, केज-4,माजलगाव-13,परळी-4, पाटोदा-2, शिरूर-1 तर वडवणी येथे 2 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.