बीड

बीडमध्ये कोरोनाचा कहर थांबेना; आजही रुग्णसंख्येत मोठी भर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

9 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आज बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने नव्वदी पार गेली आहे. आज मंगळवारी दि. 9 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 790 अहवालात तब्बल 93 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.

यात बीडमधील सर्वाधिक 43 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 22, आष्टी-2, धारूर-1, गेवराई-5, केज-4,माजलगाव-11,परळी-1, पाटोदा-2 तर शिरूर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.