बीड

रुग्णसंख्येत मोठी वाढ; आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक

7 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. काळाप्रमाणे आजही बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे.आज रवीवारी दिनांक 7 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 1222 अहवालात तब्बल 122 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यात बीडमधील सर्वाधिक 51 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 16, आष्टी-16, धारूर-1, गेवराई-12, केज-10,माजलगाव-2,परळी-4, पाटोदा-4, शिरूर-5 तर वडवणी येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच थिठिकाणी सोशल डिस्टन्सचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.